सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांच्या देखभालीला प्राधान्य द्या : सुनील केदार ; पालकमंत्र्यांकडून विकास कामांचा आढावा

वर्धा : सेवाग्राम विकास आराखडया अंतर्गत शहरातील चौकांसह ठिकठिकाणी सुशोभिकरण व सौदर्यीकरणाचे काम करण्यात आले आहे. या कामांच्या देखभालीची जबाबदारी सोपविलेल्या संस्थांकडून बांधकाम विभागाने प्राधान्याने देखभालीचे काम करुन घ्यावे, असे निर्देश पालकमंत्री सूनील केदार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवाग्राम विकास आराखडा, झोपडपट्टी धारकांना पट्टेवाटप, वर्धा जिल्हा सहकारी बँकेतील कर्मचा-यांच्या समस्या व धाम नदी पुनर्जीवन आदी विषयावर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्र्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला आमदार रणजित कांबळे, माजी आमदार अमर काळे, उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, सेलूचे तहसिलदार महेंद्र सुर्यंवशी, वर्धाचे तहसिलदार रमेश कोळपे पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता एन.आर.चव्हाण, जिल्हा उपनिबंधक बाबासाहेब भोसले, नगर पालिका विभागाचे जिल्हा सहाय्यक आयुक्त मनोजकुमार शहा, वर्धा नगर पालिकेचे मुख्याधिकारी राजेश भगत, बांधकामचे उपविभागीय अभियंता श्री.माथुळकर आदी उपस्थित होते.

सेवाग्राम विकास आराखडया अंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली असून बरेचशी कामे पुर्णत्वास आली आहे. या कामांमध्ये नोडच्या माध्यमातून शहरातील चौक रस्त्याच्या बाजुचे सौदर्यीकरण व सुशोभिकरण करण्यात आले आहे. या सौदर्यीकरण व सुशोभिकरण करण्यात आलेल्या कामाच्या ठिकाणी पाण्याची सुविधा नसल्यामुळे सुशोभिकरणातील झाडे पाण्याअभावी वाळत आहेत. त्यामुळे देखभालीची जबाबदारी देण्यात आलेल्या विविध संस्था व नगर पालिकेला करुन घ्यावी यासाठी संस्थाना पाण्याची सुविधा निर्माण करुन दयावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

सेलू तालुक्यातील झडशी वर्धा शहरातील पुलफैल, आनंदनगर, तारफैल येथील झोपडपट्टी धारकांच्या जमिनीचे तत्काळ फेरफार करुन पट्टेवाटप करावे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मच्या-यांचा वार्षिक वेतनवाढ व महागाई भत्त्याचा प्रश्न तत्काळ निकाली काढावा. यासाठी निधीची आवश्यकता असल्यास तसा प्रस्ताव शासनास सादर करावा, असेही निर्देशही श्री.केदार यांनी बैठकीत संबंधित अधिका-यांना दिले. तसेच धाम नदी पुनर्जीवन अंतर्गत धाम नदी व यशोदा नदीतील गाळ काढण्याची त्यासोबतच इतर कामे तात्काळ करण्याचे निर्देश सुध्दा यावेळी त्यांनी बैठकीत दिले. बैठकीला संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here