अचानक शेत शिवारात लागलेल्या आगीत वाचला ‘नायरा’चा ऑईल डेपो! कंपनी प्रशासनात खळबळ; दहा एकरातील झुडप जळून कोळसा

चिकणी : नजीकच्या निमगाव (सबाने) शिवारात नायरा कंपनीचा ऑईल डेपो आहे. याच ऑईल डेपोच्या शेजारी असलेल्या दहा एकरातील झुडूप अचानक लागलेल्या आगीत जळून कोळसा झाली, अग्निशमन जवानांनी अग्निशमन बंबासह वेळी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. एकूणच या घटनेमुळे नायरा कंपनी प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.

निमगाव शिवारातील नायरा एनर्जी कंपनीच्या अगदी बाजूलाच अचानक आग लागली. यात सुमारे १० एकरातील झुडपे जळून कोळसा झाली. या आगीत नायरा कंपनीचा ऑईल डेपो थोडक्यात बचावला. आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीतील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा केला. शिवाया अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले होते. कंपनीच्या बाहेरून पक्का रस्ता नसल्याने अग्निशमन विभागाच्या जवानांना अग्निशमन बंब घटनास्थळापर्यंत नेण्यास अडचणीला सामोरे जावे लागले. आगीची माहिती मिळताच मंडळ अधिकारी शौलेश देशमुख, निमगावचे तलाठी एस. टी. आगलावे, उपसरपंच सारंग सबाने, कोतवाल प्रशांत नाखले यांनी घटनास्थळ गाठून पाहणी करीत पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here