

सिंदी (रेल्वे) : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथील सत्र सात मधील कृषी विद्यार्थिनी अश्विनी साटोणे हिने गजानन झाडे विखणी यांच्या शेतात फवारणी करताना शेतकऱ्यांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे असे आव्हान कृषी दूत अश्विनी साटोणे हिने शेतकऱ्यांना केले.
शेतकऱ्यांनी फवारणी करताना कोणतेही सुरक्षा किट न वापरताना फवारणी करतात. यात विषारी रासायनिक द्रव्ये अंगावर उडत घामाद्वारे संपूर्ण शरीरात भिजते तेच हात चेहऱ्यावर जात असल्याने विषबाधेच्या घटना घडतात त्यामुळे शेतकरी बांधवानी फवारणी करताना योग्य काळजी घ्यावी. द्रावण तयार करताना नेहमी स्वच्छ पाणी वापरावे, गडूल पाणी किंवा साचलेल्या पाण्याने फवारणी करु नये. फवारणी करताना हातमोजे, मास्क, टोपी, प्राणपूर्ण पॅन्ट, चष्मा हे संरक्षक साहित्य वापरल्या शिवाय फवारणी करू नये अन्यथा विषबाधा होण्याची शक्यता असते. तसेच तंबाखू खाऊ नये, उपाशी पोटी फवारणी करू नये, जेवण झाल्यावर फवारणी करावी असे कृषी महाविद्यालयातील सहा. प्रा. आर. जे. चौधरी सी. ए. दुधबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूतांनी प्रत्यक्षित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. होणारी विषबाधा व धोका आपण आपल्यासाठी कसा टाळू शकतो असे नमूद दाखविले.