बोगस पिक कर्जाची सहा प्रकरणे उघडकीस! आरोपीच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

योगेश कांबळे

देवळी : तालुक्यात शेती संबंधित बोगस कागदपत्रे तयार करुण पिककर्जासाठी बँकेला गडविणार्या मास्टर माइंड आकाश खंडाते यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्र मधून जुलै २०१९ मध्ये एक लाख ६५ हजारांचे बोगस सात बारा, कागदपत्रे देवून कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
एकोणतीस बटे एक मौजा बोपापूर येथील शिवारात एक हेक्टर ९८ आर शेती दाखवून कर्जाची उचल केली. वास्तविक ही शेती विजय गेडाम यांच्या मालकीची असून आकाश खंडाते याने बनावट कागदोपत्री बॅंकेला स्वतः च्या नावे दाखविली
एकुण आतापर्यंत सहा प्रकरणे बोगस पिक कर्ज घेणार्याचे पोलीसांनी उघडकीस आणले आहे. यामध्ये कॅनरा बँकेचे तीन, बँक ऑफ महाराष्ट्रचे दोन तथा बँके ऑफ बडोदाचे एक प्रकरणाचा समावेश आहे.
अजूनही आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे तपास अधिकारी देवळी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांनी सांगितले.
सध्या सहा आरोपीपैकी तीन आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी वाढवून मिळाली आहे. उर्वरीत तिन आरोपींना न्यायालय कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईड संगणक चालक आकाश खंडाते यांनी कॅम्पुटरवर स्व:ताच शिक्के तयार केली असल्याची माहीती पोलीस तपासात पुढे आली आहे.
या प्रकरणात बॅकेचे कोणी कर्मचारी सहभागी आहे का? हे पोलीस तपासून बघत आहे. येत्या दोन दिवसात तपास उघडकीस येवून अजून काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेव्हरकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे हे सर्व बाजुने तपास करीत असून कोणत्याही आरोपींची गय केली जाणार नसल्याचे सागितले. अजून प्रकरणे उघडकीस आल्यास आरोपीची पोलीस कस्टडी वाढविली जाईल. स्वतः पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे हे बँकेना भेटून योग्य दिशेने तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here