पवनार येथे दूषित पाणीपुरवठा! विहिरीत अस्वच्छतेचा कळस

पवनार : गावात तब्बल दोन जलशुद्धीकरण केंद्र आहेत. गावाचा विस्तार मोठा असल्याने पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी या दोन्ही केंद्राचा वापर केला जातो. जुने जलशुद्धीकरण केंद्राच्या मशीनरी खराब झाल्याने आणि त्याकडे पाणीपुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने सध्या पवनार गावातील वॉर्ड तीन आणि चार भागात सध्या दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे विशेष म्हणजे पाणीपुरवठ्याच्या विहिरीत शेवाळ आणि कचरा असल्याचे वास्तव असून दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here