

वर्धा : २०२१ या वर्षात पेट्रोल आणि डिझेल आणि खाद्यतेलाचे दर कडाडले आहेत. याच दोन वस्तूंच्या खरेदीमुळे सर्वसामान्यांना मोठी कसरत करावी लागत असतानाच आता. घरात अत्यावश्यक असणाऱ्या साखरेचे भावही हळूहळू वाढत आहेत. साखरेचे दर ४० ते ४२ रुपये प्रतिकिलोवर पेहोचले आहेत.
ऐन श्रावणात साखरेचे दर वाढत असल्याने नोकरदारांपासून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि शेतमजुरांचे अर्थकारण कोलमडले असल्याचे दिसूत येत आहे. गौरी, गणपती, गोकुळाष्टमी, पोळा आदी सण अवघ्या काही दिवसांवर आहेत. या काळात साखरेचे भाव आणखी वाढणार असल्याचे किराणा व्यावसाविकांकडून सांगितले जात आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत नागरिकांना महागाईचा सामना करावा लागणार असून गोडवा कडवट होणार आहे.