उद्योगासाठी मिळणार 50 लाखांपर्यंत कर्ज! 500 युवक-युवतींना देणार योजनेचा लाभ

वर्धा : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत 2022-23 वर्षासाठी उद्योग व सेवा उद्योग उपक्रमांसाठी सुशिक्षित बेरोजगारांना 50 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यानी केले आहे. ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक यवतीची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंयरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुपू वाव देणारा सर्वसमावेश मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.

या योजनेला जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून अतिशय चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत असून, मागील वर्षी जिल्ह्याने 103 टक्के कर्जप्रकरणाचे उद्दिष्ट साध्य केले. त्यामुळे सन 2022-23 साठी जिल्हयाला गेल्या वर्षापेक्षा चारपट अधिक निधी उपलब्ध झाला असल्यामुळे 500 युवक-युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 ते 45 वर्ष आहे, असे लाभार्थी पात्र आहेत. रुपये 10 लाखांच्या प्रकल्पासाठी शैक्षणिक पात्रता 7 वी पास तसेच 25 लाख रुपयांच्या प्रकल्पासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास असावी. सेवा उद्योग तसेच कृषिपूरक उद्योग, व्यवसायासाठी 10 लाख रुपये तसेच उत्पादन प्रकल्पाच्या प्रवर्गासाठी 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध असून, एकुण प्रकल्प किंमतीच्या शहरी भागासाठी 25 टक्के व ग्रामीण भागासाठी 35 टक्केपर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here