उभ्या ट्रकला ट्रकची धडक! एक जखमी; दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

वडनेर : उभ्या ट्रकला ट्रकने धडक दिली. यात एक व्यक्ती जखमी झाला. हा अपघात वडनेर ग्रामीण रुग्णालयासमोर शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडला. हैदराबादकडून नगपूरकडे कच्चामाल घेऊन जात असलेल्या एच, आर. ५५ ए. डी. ७७०१ क्रमांकाच्या ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्याकडेला उभे केले.

त्यानंतर तो चहा पिण्यासाठी चहा टपरीवर गेला असता हैदराबादकडून येणाऱ्या टी.एन. ५२ एफ, ५८५३ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने उभ्या ट्रकला धडक दिली. यात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आरोपी ट्रक चालक जखमी झाला. या अपघाताची नोंद वडनेर पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here