पालकमंत्र्यांच्या पुतळ्याचे केले दहन! ‘पोलीस वेलफेअरच्या पेट्रोलपंपाची जागा बदलविण्याची मागणी

वर्धा : स्थानिक सिव्हिल लाइन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी वेलफेअरच्यावतीने पेट्रोलपंप उभारल्या जात आहे. याच पेट्रोल पंपाची जागा बदलविण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी पेट्रोलपंप हटाओ समितीच्या नेतृत्वात रविवारी वर्धा शहरातील विविध भागात पालकमंत्री सुनील केदार तसेच माजी मंत्री तथा आमदार रणजित कांबळे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पालकमंत्री सुनील केदार तसेच आ. रणजित कांबळे यांच्या हुकूमशाही धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी उभारल्या जात असलेल्या पेट्रोल पंपाला विरोध नाही; ‘पण नियोजित जागेला विरोध दर्शवित पेट्रोलपंप कृती समितीच्यावतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. सदर साखळी उपोषणाच्या ६० व्या दिवशीही आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी रविवारी वर्धा शहरातील विविध भागात पालकमंत्री सुनील केदार तसेच माजी मंत्री तथा आमदार रणजित कांबळे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनात पेट्रोलपंप हटाव कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here