फोन उचलला नाही म्हणून युवकाने केली मारहाण

वर्धा : २२ वर्षीय मुलीला प्रेम करतो तुझ्यावर, फोन का उचलत नाही, असे म्हणून युवकाने मारहाण केली. ही घटना पुलगाव येथील तहसील कार्यालयासमोर रोडवर २८ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार, पीडित युवती ही जेवण करून रोडवर पायदळ फिरत होती.

दरम्यान, आरोपी अरुण मुळे रा. भीमनगर, पुलगाव याने पीडित युवतीचा पाठलाग करून मी तुझ्यासोबत प्रेम करतो, तु माझा फोन का उचलत नाही, असे म्हणून विनयभंग केला. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीच्या गालावर थापडा मारून निघून गेला. याप्रकरणी पीडित युवतीच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिस ठाण्यात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here