नाणी अभ्यासात संशोधकांचा चिकीत्सक दृष्टीकोन महत्त्वाचा – सतिशराव राऊत

वर्धा : सर्वसामान्य माणूस केवळ ऐतिहासीक वास्तू, शिल्प, नाणी, कला डोळ्यांनी बघतो. संशोधक चिकीत्सक असला की तो वेगवेगळ्या भूमिकेतून इतिहासाची भव्यता, दिव्यता, दृढता, परिस्थिती, विविध कलेचा विकास आपल्या लेखणीतून भूतकाळाचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर मांडू शकतो. त्यासाठी त्यांना दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो असे मत मा. सतिशराव राऊत यशवंत ग्रामीण शिक्षण संरथेचे उपाध्यक्ष यांनी यशवंत महाविद्यालय, वर्धा इतिहास विभागाच्या वतीने पदवी व पदव्युत्तर इतिहास अभ्यास मंडळाचे उद्‌घाटन निमित्ताने व लोकनेते माजी आमदार प्रा. सुरेशभाउऊः देशमुख ‘अमृत महोत्सव’ कूतज्ञता सोहळ्याच्या औचीत्यप्रसंगी ‘ऐतिहासिक नाणी प्रदर्शनी’ प्रसंगी आयोजीत व्याख्यानात व्यक्‍त केले. याप्रसंगी विचारपीठावर कार्यक्रमाचे विशेष अतिथी, डॉ. तिर्थनंदन बन्नागरे (नाणी संकलक), डॉ. विलासराव देशमुख, डॉ. रवींद्र बेळे, डॉ. विरेंद्र बैस, डॉ. पुरूषोत्तम खोब्रागडे, डॉ. प्रिययज महेशकर, डॉ. अनंत रिंढे, डॉ. शहनाज शेख, प्रा. राजेंद्र तेलंग यांची उपस्थिती होती.

ऐतिहासिक नाण्यांकडे प्राचीन काळापासून ते आजगायात बघण्याचा सर्वरपर्शी दृष्टीकोन सातत्याने बदल राहीला आहे. तो सर्वसामान्याचा वाणीतून ‘चमडी जाये पर दमडी न जाये” या अर्थाने व्यक्‍त झालेला दिसतो. असे जरी असले तरी भारतातील विविध सत्तांनी आपल्या कार्यकाळात विविध धातूची नाणी पाडून तत्कालीन परिरिथतीचा एकप्रकारे समृद्ध संदेशच दिला असे अलयाचे दिसून येते असे विचार डॉ. तीर्थनंदन बन्नगरे (नाणी संकलक), रोहणा यांनी आपल्या भाषणातून व्यक्‍त केले. वर्धा जिल्ह्याला एक ऐतहासिक वारसा आहे. ही सांस्कृतीक धरोहर नाणकशासत्राच्या अभ्यासकांनी विविध प्रकल्प राबवून विद्यार्थ्याना जास्तीत जास्त सहभागी करून घेणे ही काळाची गरज म्हणून इतिहास विभागाने आयोजित केलेली ‘नाणी प्रदर्शनी’ रतुत्य उपक्रम ठरल्याचे प्रतिपादन प्राचार्य, डॉ. रवींद्र बेले यांनी व्यक्‍त केले. महाराष्ट्रात शिवकालीन नाण्यांवर अनेक चित्र कोरली आहे. पण तिचे वर्णन मीडी लिपीत आहे. तत्कालीन शासकांची ती राजभाषा होती. त्याचा अभ्यास नसल्याने आधुनिक संशोधकांना अडचण निर्माण होतांना दिसते. त्यासाठी तजांबर येथील ‘सरस्वती महल’ ही ग्रंथालय आणि तेथील मीडी लीपीचे अभ्यासक यांची मदत घेऊन इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून समाजासमोर त्या नाण्यांचे महत्त्व प्रतिपादन करणे गरजेचे ठरते असे विचार डॉ. विलासराव देशमुख यांनी व्यक्‍त केले.

सिंधू/ हडप्पा संरकृतीचा वाड्मयीन इतिहास उपलब्ध नसल्याने तत्कालीन भोतिक साधन म्हणून ‘नाणी’ महत्त्वाची ठरली आहे. त्याआधाने या संस्कृतीचा अभ्यास संशोधकंनी केल्याचे दिसून येते असे विचार इतिहास लेखक डॉ. विरेंद्र बैस यांनी याप्रसंगी व्यक्‍त केले. नाणकशारत्राचे जाणकार धम्मानंद कोसंबी यांची वर्धा जिल्हा ही कर्मभूमी असून त्यांनी जगासमोर नाण्यांचा अभ्यासून एक ऐतिहासीक दरताऐवज उपलब्ध करून दिला आहे. नाण्यांच्या अभ्यासकांनी त्यांचा संदर्भ घेऊन समकालीन इतिहासाची मांडणी केली पाहीजे असे मत डॉ. प्रियराज महेशकर यांनी याप्रसंगी व्यक्‍त केले. बाकाटकांची राजधानी असलेले आधुनिक पवनार आणि तेथील उपलब्ध असलेली नाणी नविन संशोधकांना संदर्भकरीता अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी डॉ. पुरूषोत्तम खोब्रागडे यांनी व्यक्‍त केले. समुद्रगुप्ताची नाण्यावरील विणाधारी मुद्रा ही गुप्तराजे संगीत कलेचे चाहते व संगीत कलेला राजदरबारी मानाचे स्थान देणारे होते असे तत्कालीन नाणीवरून ठळकपणे दिसून येते असे डॉ. अनंत रेंढे यांनी प्रतिपादन केले.

नाणी संकलक डॉ. बन्नागरे यांनी नाण्यांचा संग्रह करून आज इतिहासाच्या विद्यार्थ्यांना नाणी प्रदर्शनीच्या माध्यमातून एक नवी प्रेंणा दिली आहे. इतिहास अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यानी असे नाविण्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले पाहीजे असे प्रार्ताविक मत डॉ. शहनाज शेख यांनी व्यक्‍त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नरेश कवाडे, संचालन रत्नमाला उपरिकर आभार प्रदर्शन साक्षी लोखंडे यांनी केले. देवळी, वायगांव, सेलू, वर्धा येथील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीचा लाभ घेतला. या प्रदर्शनीला रथानिक इतिहासाचे प्राध्यापक, इतिहासप्रेमी, संशोधक विचारवंत यांनी भेट दिली. या कार्यक्रमाच्या यशरबीतेसाठी, विभागातील प्राध्यापक रूपेश वनशिंगे, प्रा. चंद्रकांत राडे, डॉ. संजय पुनरकर, प्रा. निलेश क्षिरसागर, प्रा. गौरव तामगाडगे, डॉ. अतुल शिदुरकर प्रा. केतकी राणे, प्रा. प्रफुल्ल काळे, प्रा. निमसडे, प्रा. गोडबोले मॅडम यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व (एन सी सी विद्यार्थी) इतिहास अभ्यास मंडळाचे पदाधिकारी, तसेच बाबाराव काशिद, रियाज शेख, भगवान गुजरकर, संजय लभाने यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here