कट बसल्याने दुचाकीस्वार मुलीचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू! ट्रकचालकाला घेतले ताब्यात

वर्धा : दूध आणण्यासाठी गेलेल्या मोटारसायकलस्वार मुलीला ट्रकने कट दिल्याने मुलगी थेट ट्रकच्या चाकात येत चिरडली गेली. अपघात इतका भीषण होता की मुलीच्या कॅबरेखालील भागाचा चेंदामेंदा झाल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात ५ रोजी सकाळी ७-3०ते ८ वाजताच्या सुमारास कारला चौक परिसरात झाला, याप्रकरणी ट्रकचालकास रामनगर पोलिसांनी ताब्यात घेत ट्रक पोलिस ठाण्यात लावला. वैष्णवी गिरीश डांगे (१७, रा. सावजीनगर कारला चौक) असे मृत मुलीचे नाव आहे.

वैष्णवी ही एमएच. 3२, एए. ६५६४ क्रमांकाच्या मोटारसायकलने घरून कारला चौकाकडे दूध आणण्यासाठी गेली होती, दूध घेऊन परत घरी जात असताना सावंगीकडून नागपूरकडे भरधाव जात असलेल्या एमएच.२६, बीई ४१०८ क्रमांकाच्या ट्रकने मोटारसायकलला कट मारला असता वैष्णवी ही रस्त्यावर पडली आणि थेट ट्रकच्या मागील चाकात आल्याने चिरडली गेली. तिला तत्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकचालकास ताब्यात घेत ट्रक पोलिस ठाण्यात लावत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here