पारधी वस्तीवर जागतिक साक्षरता दिन साजरा! दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन

देवळी : तालुक्यात असलेल्या आगरगाव पारधी वस्ती येथे जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यात आला. यावेळी साक्षरता दिनाच्या निमित्ताने आगरगाव पारधी वस्तीतील विद्यार्थ्यांच्या लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सोबतच वस्तीतील विद्यार्थ्यांना लोणी येथील उच्चशिक्षित ललित मेश्राम, आकाश मेश्राम व मंथन गजभिये यांनी आगरगाव पारधी वस्तीतील वाचनालयाला पुस्तके भेट दिली.
आगरगाव पारधी वस्तीतील समाजसेवक अचिन पवार यांच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाला हातभार लावला दहावी, अकरावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदनही केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ललित मेश्राम व आकाश मेश्राम हे आगरगाव पारधी वस्तीतील विद्यार्थ्यांशी बोलताना म्हणाले की तुम्हीही आमच्यासारखे उच्चशिक्षित व्हा आणि समाजामध्ये एक चांगली प्रतिष्ठा निर्माण करावी व जसे अचिन पवार हे तुम्हाला शिकवत आहेत तसे तुम्हीही इतरांना शिकवाव अचिन पवार हे तुम्हाला अथक परिश्रम करुन शिकवत आहेत त्याच तुम्ही सार्थक केलं पाहिजे असे मार्गदर्शन केले.
यावेळी पत्रकार सुरज फुसाटे, आकाश पवार, विकेंद्र काळे, अजित पवार, विशाल पवार, कृषी चव्हाण, अमित पवार, जय काळे, अमेश भोसले, अमिता पवार, वैशाली पवार, स्नेहा पवार, मीर्जुना काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अचिन पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अजय काळे यांनी मानले या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते अचिन पवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here