
हिंगणघाट : रस्त्याच्या कडेला कार का घेतली नाही यावरून वाद करीत दोघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना न्यू यशवंतनगर वॉर्डात घडली.
तुषार तुकाराम मुंडे हा मित्रासोबत कारने घरी जात असताना आरोपी अनुप सुरेश. बनसोड याने कार रस्त्याच्या कडेला का घेतली नाही, असे म्हणून वाद घातला, इतक्यावरच न थांबता अनुपने दोघांनाही मारहाण केली. त्यानंतर तुषारच्या घरी जात चांगळाच गोंधळ घातला. याप्रकरणी तुषार मुंडे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनुप बनसोडविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक दिपेश ठाकरे करीत आहे.