
वर्धा : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागले आहे. मतमोजणीला सुरुवात होण्याआधीपासूनच सोशल मीडियात ईव्हीएम मशिनविरोधातील हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार होत असल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहे.
निवडणूक निकालानंतरही ईव्हीएम बंदीची मोहीम सोशम मीडियात राबवली जाताना दिसत आहे. #BanEVM_SaveDemocracy हा हॅशटॅग ट्विटरवर जोरदार ट्रेंड होताना दिसतोय. अनेकांनी ईव्हीएमवर निवडणुका घेणं बंद करण्याचं आवाहन केलं आहे.
ईव्हीएममध्ये फेरफार करुन जनतेच्या मतांचा अनादर केला जात आहे. सर्व निवडणुकांमध्ये फिक्सिंग होत आहे, लोकशाहीचा गळा घोटला जात आहे अशी विविध मतं नेटिझन्स व्यक्त करत आहेत. देशातील लोकशाही वाचवायची असेल तर ईव्हीएमवर बंदी घालणं गरजेचं आहे, असंही अनेकांनी म्हटलं आहे.