अंगणवाडी सेविकेच्या घरात घातला धिंगाणा! चार आरोपींना ठोकल्या बेड्या; घरातील साहित्याची केली नासधूस

पुलगाव : अंगणवाडी सेविकेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत चौघांनी साहित्याची फेकाफेक करून नासधूस करीत तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना खडकपुरा गावात १८ रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी १९ रोजी चारही आरोपींना अटक केल्याची माहिती दिली. सुरेखा वासुदेव रोहनकर ही तिच्या मुलींसह घरासमोर बसून असताना बंटी नाईक, प्रेमसागर मेसराम, विकेश पोयाम, आदिल शेख रा. पुलगाव यांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश करून त्यांच्या दोन्ही मुलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या जवळ असलेल्या तलवारीने दहशत पसरवून दरवाजावर तलवारीने मारहाण केली. घरातील भांडी, इतर साहित्याची नासधूस करून नुकसान करीत मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्यांनी पुलगाव पोलिसात तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपींना अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here