अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह ट्रक जप्त! महसूल प्रशासनाची कारवाई; वाळूमाफिया सक्रिय

समु्द्रपूर : अवैधपणे रेती उपसा करून विकण्याच्या धंद्याला तेजी आली असतानाच विनारॉयल्टी रेती वाहतुक करणाऱ्या टिप्पर व ट्रॅक्टरवर महसूल प्रशासनाने कारवाई केली. अवैधरीत्या वाळूची विनापरवाना वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रकवर कारवाई करीत वाळू साठ्यासह टॅक्टर व ट्रक जप्त केले. बुधवारी 9 मार्च रोजी दुपारी 12 वजता हिंगणघाट उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे व मंडल अधिकारी भलावी यांनी हळदगाव नजीक अवैधरित्या वाळू भरून ट्रॅक्टर व ट्रक जात असताना चौकशी केली असता विनापरवाना अवैधरित्या वाळू जाहतुक करीत असल्याचे आढळून आले. दोन्ही वानचालकांना विचारणा केली असता त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याचे दिसून आले.

यावेळी दोनही वाहनांना ताब्यात घेत ट्रॅक्टर ट्राली क्रमांक एम.एच. 32 एएस 0260 व ट्रक क्रमांक एम.एच.36 एफ 2710 या वाहनावर कारवाई करत समुद्रपूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. चोरट्या मार्गाने रेती वाहतुक करीत असताना ताब्याता घेऊन तहसील कार्यालयात जमा केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. चोरीबाबत माहिती घेतली असता प्रशासन कारवाईसाठी जात असलेली गुप्त माहिती वाळू माफियांना मिळत असल्याने या भागातील वाळूतस्कर चोरी करण्यात यशस्वी होत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने समुद्रपूर तहसीलमधील घाटातून रेती चोरीबाबत ठोस पाऊल उचलावे, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी नागरिक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here