स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव निमित्य जिल्हास्तरीय भिंती चित्र स्पर्धत जिजामाता विद्यालय प्रथम

वर्धा : महात्मा गांधी यांच्या पावनभूमीत स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव व संविधान दिनाचे औचित्य साधून भिंती चित्र स्पर्धेचे आयोजन वर्धा जिल्हाधिकारी , जी एस टी ऑडिट नागपूर ,शिक्षण विभाग व सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने सिव्हिल लाईन परिसर येथे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील 34 शाळा सहभागी झाल्या होत्या यामध्ये वर्ग 8 ते 12 पर्यंत चे विध्यार्थी व एक शिक्षक असा ग्रुप तयार करण्यात आला होता. संपूर्ण जिल्ह्यातून 240 विद्यार्थी सहभागी झाले होते. गांधी व त्याचे जीवन कार्य हा विषयावर एकापेक्षा एक सुंदर भिंतीचित्र रंगवून संपूर्ण गांधीजींचा जीवनावर आधारित चित्राने शहरातील भिंती बोलक्या केल्या. यामध्ये बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात आले.

आज पुरस्कार वितरण कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, प्रशांत पाटील, प्रमुख सेंट्रल जी एस टी ऑडीट नागपूर श्री जिल्हा नियोजन अधिकारी कळमकर, जिल्हा ग्रंथपाल अधिकारी नितीन सोनवणे तसेच उपशिक्षणाधिकारी सौ तळवेकर मॅडम यांच्या हस्ते प्रथम पुरस्कार जिजामाता विद्यालय वर्धा कलाशिक्षक आशिष पोहाणे, चंद्रशेखर शेंडे, लोकेश गाडगे, आर्यन यादव, अक्षय सोमनकर, यांना मिळाला.

द्वितीय पुरस्कार यशवंत विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर तर तृतीय पारितोषिक मुन्सिपल नेहरू विद्यालय सिंदी रेल्वे यांनी पटकाविला. या कायर्कर्माचे नियोजन प्रफुल सातवकर, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई आशिष पोहाणे, अध्यक्ष कलाध्यापक संघ वर्धा यांनी केले.

कार्यक्रमाकरिता जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी गजानन नवघरे, उत्तम वानखडे, राजीव बन्सी, सुभाष राठोड, रवी राठोड, प्राचार्य सुधाकर, गोरडे सुभाष जगताप, ललित इंगळे, प्रा राजेश डंभारे, प्रा मोहन गुजरकर, मेघा फासगे, सचिन माटे, उमेश साठवणे, दिव्या खंडाईत, शीतल सोनटक्के, किशोर उकेकर, अरविंद दहापुते, अमोल भांदक्कर, विशाल जाचक, प्रशांत बोरकर, रवींद्र मुटे, सुरेखा हिंगे, एस सुटे, यांनी सहकार्य केले. भिंती चित्राकारिता सर्व साहित्य जिल्हाधिकारी व सेंट्रल जि एस टी ऑडिट नागपूर यांच्या सहयोगाने प्राप्त झाले होते. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुबंई यांनी सर्व स्पर्धकांना भोजनाची व्यवस्था केली. या आयोजनमागे वर्धा कलाध्यापक संघ वर्धा सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here