प्रेयसीच्या घरातच प्रियकरावर चाकूहल्ला! सावंगी पोलिसात तक्रार केली दाखल

वर्धा : प्रियकराला प्रेयसीच्या घरी बोलावून प्रेयसीच्या भावाने प्रियकरावर चाकूहल्ला करून जखमी केल्याची घटना सालोड हिरापूर गावात ७ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी ८ रोजी तक्रार दाखल करण्यात आली. पवन नामक युवकाचे आरोपी रोशन पासवान याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याने रोशनच्या वडिलांनी पवन आणि त्याच्या आई-वडिलांना घरी बोलाविले होते. दरम्यान, मुलीचे आई-वडील मुलीला मारहाण करीत असताना पवन हा त्या ठिकाणी गेला असता त्याला आरोपी रोशन पासवान याने चाकूने मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here