

वर्धा : शहरात गत काही दिवसांपासून जुगार, सट्टापड्टी अवैधरीत्या सुरू असल्याची माहिती मिळताच शहर व रामनगर पोलिसांनी रविवारी विविध ठिकाणी छापा टाकून १४ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १० हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शास्त्री चौक परिसरात अवैध चालू असलेले सट्टापट्टी अड्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई प्रकाश कल्लू प्रसाद श्रीवास (वय ४६ रा. गौरक्षण वॉर्ड, अक्षय विठ्ठल वैद्य (वय २७) स. इतवारा बाजार, शाहरुख गफुर खां पठाण (वय ३०), रियाज रहिम शेख (वय २५) व जावेद शेख रफीक (वय ३२) रा. महादेवपूर आदी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीकडून सट्टापट्टीचे साहित्य व रोख ५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रामनगर पोलिसांनी पवन हरिषचंद्र चावरे (वय २२), अनिकेत गजानन ईश्वरकर (वय २३), नितेश रमेशसिंग बैस (वय ३८) व प्रशील तुकाराम किनगांबवकर (वय ४०) या आरोपीला ताब्यात घेऊन आरोपीकडून रोख १ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.