अज्ञात वाहनाच्या घडकेत दुचाकीस्वार ठार! मानोरा शिवारातील घटना

हिंगणघाट : शेतीपयोगी साहित्य खरेदी करुन घराच्या दिशेने निघालेल्या आकाश सर्जेराव कुमरे (26) रा नागरी जिश चंद्रपूर या युवा शेतकर्‍याचा दूचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना आज 12 रोजी मानोरा शिवारात घडली. मिळालेल्या माहितीनुसार आकाश कुमरे हा बाजारातून शेतीपयोगी साहित्य खरेदी करुन एम.एच. 34-ए.एल.-1458 या दुचाकीने गावाच्या दिशेने निघाला होता.

दरम्यान मोनेारा शिवारात त्याच्या दूचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत आकाश कुमरे या युवा शेतकर्‍याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताप हिंगणघाट पोलिस स्टेशनचे पीएसआय आगाशे हे आपल्या सहकार्‍यांबरोबर घटनास्थळी पोहचत पंचनामा करुन मृतकाचे शव स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. या प्रकरणी अज्ञात मोटरसायकलस्वार व्यक्तिविरोधात विविध कलमाअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास हिंगणघाट पोलिस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here