पैशाच्या वादातून युवकास काठीने मारहाण! पोलिसात तक्रार दाखल

सेलू : पैशाच्या कारणातून वाद करीत युवकाच्या डोक्यावर काठीने मारहाण करीत त्याला गंभीर जखमी करण्यात आले. कोथीवाडा गावात ही घटना ८ रोजी घडली. विष्णू रामभाऊ वाटेकर याने शिवा देवारे याच्याकडून १ हजार १०० रुपये उसनवारीने घेतले होते. त्यापैकी ७०० रुपये विष्णूने शिवा देवारे याला परत केले होते. पण, ते पैसे घेण्यास शिवाने नकार दिला. याच कारणातून शिवाने वाद करीत विष्णूच्या डोक्यावर काठीने मारहाण करीत जखमी केले. या प्रकरणी सेलू पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीविरूद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here