कंटेनर व टिप्परच्या भीषण अपघातात! अपघातात चालक ठार

येरला : कंटेनर टिप्परच्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या कंटेनर चालकाचा हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपाचारा दरम्यान मुत्यू झाला. ही घटना नागपूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील हिंगणघाट शहरानजीकच्या वणी येथील सगुणा फॅक्टरीजलळील वळणावर बुधवारी 9 मार्चला सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.

हिंगणघाटकडून वडनेरकडे जात असलेल्या कंटेनर टिप्परचा भीषण अपघात झाला. यावेळी कंटेनर चालक कॅबिनमध्ये फसून गंभीर जखमी झाला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने फसलेल्या चालकास बाहेर काढून तातडीने रुग्णवाहिकेचे साहाय्याने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गिट्टी भरलेला टिप्पर क्रमांक एम. पी. 50 एच 0851 व कंटेनर क्रमांक एच. आर. 38 ए. बी. 3497 हे दोन्ही वाहन हिंगणघाटकडून वडनेरकडे जात असताना वणी सगुणा फॅक्टरीजवळील वळणावर एकमेकांवर धडकले.

या भीषण अपघात कंटेनर चालक प्रवीण पटेल रा. हरियाना हा गंभीर जखमी झाला. अपघाची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी स्वप्नील जिवने, आशीष गेडाम यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान, गंभीर जखमी झालेल्या कंटेनर चालक प्रवीण पटेल याचा मृत्यु झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here