
हिंगणघाट : जेवणाच्या वादातून अज्ञात चार लोकांनी हॉटेलमध्ये तोडफोड केली. दरम्यान हॉटेलमधील नोकर जखमी झाला असून हजारांचे नुकसान झाले. नागपूर रोडवर असलेल्या राणा फॅमिली रेस्टॉरंट येथे घटना घडली. .
राणा फॅमिली रेस्टोरंट येथे अज्ञात चार युवक जेवणासाठी आले होते. त्यावेळी जेवणाचा वेळ संपल्याने हॉटेल संचालक व नोकरांनी आता आमचा वेळ संपला, असे सांगितले. त्यावरून शिव्या देत ते अज्ञात चार युवक परत गेले. त्यानंतर रात्रीच्या वेळी ते अज्ञात युवक राणा रेस्टॉरँट मध्ये आले. तेव्हा रेस्टॉरंट बंद होते. त्यांनी दार ठोकले असता रेस्टॉरंटमधील नोकर श्याम सोळंकी याने दार उघडले असता अज्ञात चार युवकांनी श्याम सोळंकी यांना मारहाण करीत जखमी केले. परत जाताना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस हवालदार राजकुमार कुवर करीत आहेत.
















































