क्षुल्लक वादातून माय-लेकीस मारहाण

तळेगाव : मोबाइल का नेऊन दिला, या कारणातून वाद करीत माय-लेकीस काठीने मारहाण करण्यात आली. काकडघरा येथे ही घटना घडली. सुरेखा पानपगार ही घरी असताना शेजारी राहणारा सचिन उत्तम सोनवणे हा घरात आला आणि तुझ्या मुलीने कोणाचा मोबाइल नेऊन दिला, अशी विचारणा केली. दरम्यान तिच्या मुलीने रूपालीला मोबाइल नेऊन दिला असल्याचे सांगितले असता तू मोबाइल का नेऊन दिला, असे म्हणत सचिनने काठीने मारहाण केली. दरम्यान सुरेखा वाद सोडविण्यास गेली असता तिलाही मारहाण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here