जंगली श्वापदाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी! अचानक छातीला जबर धडक

चिकणी : नजीकच्या दिघी बोपापूर येथील संजीवनी शुक्राचार्य वाघमारे (४७) या आपल्या शेतात शेतकाम करीत होत्या. अचानक रानटी डुक्कराने छातीला जबर धडक दिली व चावा घेऊन गंभीर जखमी केले. यामध्ये रक्त स्त्राव झाला.

तात्काळ ग्रामीण रूग्णालयात देवळी येथे नेण्यात आले. प्राथमिक उपचार घेवून जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे हलविण्यात आले. तेथे बेडची उपलब्धता व तपासणी यंत्र नसल्याने खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहे. वनविभागाला घटनेचे माहिती देताच वनश्रेत्र साहाय्यक वर्धा शिरपूरकर , वनरक्षक एस.बी.हांङे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

यावेळी सरपंच घनश्याम कांबळे व पोलिस पाटिल प्रतिभा फुलमाळी उपस्थित होते. वन परिक्षेत्र अधिकारी यांना लेखी अर्जाद्वारे तात्काळ उपचार खर्च व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here