
पवनार : हनुमान जयंतीच्या निमित्ताने पवनार येथील बस स्टॅण्ड चौकात नवदुर्गा पूजा उत्सव समितीच्या वतीने यंदाही भव्य लंगर (महाप्रसाद) आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भक्तीभावाने प्रसादाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, दरवर्षी हनुमान जयंतीच्या निमित्ताने या समितीकडून अशा भव्य लंगराचे आयोजन करण्यात येते. या परंपरेमुळे समाजात एकात्मता, बंधुभाव आणि सेवाभावाची भावना दृढ होत असल्याचे नागरिकांनी व्यक्त केले.
लंगराच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रसादाचे वाटप करत संपूर्ण व्यवस्थापन सुरळीत ठेवले. परिसरात स्वच्छतेचीही विशेष काळजी घेण्यात आली होती. नवदुर्गा पूजा उत्सव समितीच्या या उपक्रमामुळे हनुमान जयंती पवनारमध्ये भक्तीभाव, सामाजिक एकात्मता आणि सेवाभावाचा संदेश देत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी युवा उद्योजक वैभव उमाटे, अमोल उमाटे, सुनील उमाटे, वैष्णव उमाटे, गणेश चंदनखेडे, प्रसाद भट, शेखर चंदनखेडे, विवेक भट, संकेत उमाटे, दीप चकोले, मनोज नाकाडे, भूषण वाटमोडे, शुभम उमाटे, बादल जोगे, विकी उराडे, विकी रघाटाटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.





















































