कामगारांचा उद्यापासून दोन दिवसीय देशव्यापी संप! सिटू, आयटकसह विविध संघटनाचा सहभाग

वर्धा : केंद्र सरकारने जगण्याचे, रोजी रोटीचे प्रश्‍न सोडवून लोकांना चांगले जीवन देण्याऐवजी त्यांना संकटात टाकण्याचा विडा उचलला आहे. दैनंदिन रोजी- रोटीच्या प्रश्‍नांवर जनता होरपळत असून महागाईने त्रस्त झाली आहे. त्यांचे लक्ष ख-या प्रश्‍नांवरून हटविण्यासाठी त्यांच्या न्याय मागण्या दाबून टाकून त्यांच्या वर हुकुमशाही लादली जात आहे. परंतु शेतकरी, कामगार, बेरोजगार युवा आणि विद्यार्थी मात्र आपल्या मुलभूत प्रश्‍नांवर खंबीरपणे लढत आहे. आता सरकारच्या विरोधात एकजूट होऊन लढण्याचा निर्णय सर्व श्रमिक संघटनेने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून 28 व 29 मार्च ला सिटू-आयटक व ऑल इंडिया पोस्ट एम्पलाईज युनियन, नॅशनल युनियन ऑफ एम्प्लाईजव्दारा दोन दिवशीय देशव्यापी संपाचे आयोजन करण्यात आले आहे.

आशा-गट प्रवर्तक, अंगणवाडी सेवविका-मदतनीस आदी कर्मचा-यांना शासकीय कर्मचा- यांचा दर्जा देण्यात यावा, शालेय पोषण आहार, अंशकालीन स्त्री परिचर आदींना योग्य मानधन वाढ व सेवेत कायम करा. योजना कर्मचा-यांना दरमहा 21 हजार वेतन द्या. कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा नियमीत करा, सार्वजनिक उद्योग रेल्वे, टेलीफोन, कोल माईन्स या सर्व क्षेत्राचे खासगीकरण बंद करा, कामगार-कर्मचारी विरोधी कायदे रद्द करा. श्रमिक-कामगारा विरोधी कायदे रद्द करा, जुनी पेंशन योजना लागू कर ग्रॅज्यटी. विमा. प्राव्हिडंट फंड आदि सामाजिक सुरक्षा पूर्ववत प्रदान करा, कर्मचा-यांच्या रिक्‍त जागा त्वरीत भरा, बेरोजगारांना काम द्या, दोन कोटी नोक-या दरवर्षी देण्याचे आश्वासन पूर्ण करा,शेतक-यांची कर्जमाफी व स्वामिनाथन कमिशनप्रमाणे हमी दर द्या.

देशभरातील महिलांना सुरक्षा प्रदान करा, महिला अत्याचारांना पायबंद घाला. आदींसह विविध मागण्यांबाबत आंदोलन करण्यात येणार आहे. 28 मार्च ला सकाळी 11 वाजता सिटू कार्यालयात आंदोलन करण्यात येईल. 29 मार्च ला तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येईल. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन यशवंत झाडे, भय्या देशकर, अर्चना घुगरे, अर्चना मोकाशी, रंजना सावरकर, प्रमिला वानखेडे, अलका जराते, विनोद तडस, कमकलाकर मरघडे सह विविध संघटनेच्या पदाधिका-यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here