राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून कोविड विद्यार्थी पालक अभियान! अनेकांना मिळणार लाभ

0
184

सेलू : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पूर्ण राज्यभर ‘कोविड विद्यार्थी-पालक अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांचे पालक करोना विषाणूला बळी पडले आणि दुर्दैवाने त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला अशा पालकांच्या पाल्यांच्या शिक्षणाच्या एकूण खर्चाच्या काही खर्चाची जबाबदारी समाजातील दानशूर व्यक्तींनी घ्यावी असे आवाहन या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

कोविड विषाणूमुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक त्यांना हे जग सोडून गेले त्या विद्यार्थ्यांवर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना मदतीचा हात देणे ही समाजातील सर्वच जणांची सामाजिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी जाणून घेत समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या विद्यार्थ्यांना मदत करणे गरजेचे आहे. या अभियानाच्या माध्यमातून करोनामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या अनेक विद्यार्थी आणि समाजातील दानशूर व्यक्ती यांच्यातील दुवा होण्याचं काम येणाऱ्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नागपूर विभागातील सर्व पदाधिकारी आणि सदस्य करतील अशी भूमिका नागपूर विभागाचे अध्यक्ष आशिष आवळे यांनी मांडली आहे.

याप्रमाणे येणाऱ्या काळात वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थी आणि दानशूर व्यक्ती यांनी संपर्क करण्याचे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज देवळीकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा करोना विषाणूच्या साथीत दुर्दैवी मृत्यू झाला अश्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहाचत त्यांना मदत करणार असल्याचे देखील विद्यार्थी तालुका अध्यक्ष अमन साटोने यांनी सांगितले.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here