
वर्धा : वीज पडून तघे जागीच ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना आज रविवार (ता. १३) दुपारी तीन वाजताच्या सुमारास देवळी तालुक्यातील सिरसगाव (धनाठ्य) येथील शिवारात घडली.
अनुसया नथुजी कसार वय (६० वर्षे) अश्वीनी सतोष कसार, वय १२ वर्षे) व त्यांचा नरेश नावाचा घर गडी, सर्व रा. सिरसगाव असे मृतांची नावे आहे. तर नथुजी कसार, वय (७० वर्षे) देवीदास मगर, वय (४५ वर्षे) हे जखमी झाले आहेत.
शेतात काम करत असताना अचानक विजांचा कडकडाट पाऊस चालु झाल्याने शेतातील झोपडीत थांबलेल्या व्यक्तींचा यात नाहक बळी गेला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली होत आहे.