६८ हजारांचे साहित्य चोरट्यांनी पळविले! पोलिसांत गुन्हा दाखल

देवळी : तालुक्यातील विजय गोपालनजीकच्या हिरापूर शिवारातील बालाजी जिनिंगमध्ये चोरट्यांनी हात साफ करून ६८ हजार रुपयांचे साहित्य लंपास केले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुपारास उघडकीस आली असून, याप्रकरणी पुलगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

सीमा महेश चुडीवाल (४७, रा. वलीसाहेब वॉर्ड आर्वी) या मंगळवारी मुलासोबत जिनिंगमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेल्या असता तेथील रेचेवरील पाच एचपीच्या आठ मोटर, ओपनर मशीनला लागून असलेली साडेसात एचपीची एक मोटर, एअर कॉम्प्रसर मशीनला लागून असलेली तीन एचपीची एक मोटर आणि रुई गठाण प्रेस मशीनच्या कॉंइल बॉक्समधील तार, असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here