तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्यास अटक

आर्वी : हातात तलवार घेऊन गावात दहशत पसरविणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून तलवार जप्त केली. ही घटना बोरगाव (हातला) येथे मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. सुनील रघुनाथ भगत (४५) रा. बोरगाव (हातला) असे आरोपीचे नाव आहे.

एक व्यक्ती हातात मोठी तलवार घेऊन गावात दहशत पसरवीत असल्याची माहिती आर्वी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. तेव्हा सुनील भगत हा गावातील सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडील तलवार जप्त करून आरोपीला अटक केली. ही कारवाई आर्वी पोलीस स्टेशनाच्या कर्मचाऱ्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here