अपघातात एक ठार तर एक जखमी

सेवाग्राम : नजिकच्या सेलू रोड ते तुळजापूर मार्गावर रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात खडका येथील नीलेश प्रभाकर सयाम (३२) याचा मृत्यू झाला तर शांताराम झिटे हे जखमी झाले. रुग्णालयात दाखल असलेल्या पत्नीला जेवणाचा डब्बा देण्यासाठी नीलेश सयाम हा जात होता तर बैलगाडी घेऊन जाणारे गजानन जिकार हे बैलाची बेड्डी सुटल्याने रस्त्याच्याकडेला बैलगाडी करून ती बांधत होते. दरम्यान, भरधाव दुचाकी जिकार यांच्या अंगावर चढली. यात दोघेही जखमी झाले. सेवाग्राम येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती सयाम याला मृत घोषित केले तर झिटे याच्यावर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here