जलयोद्धा ‘अभिजित’चा कटर मशीनच्या ब्लेडने मृत्यू! मांडवा येथील घटनेने हळहळ

आर्वी : आर्वी तालुक्यातील टेंभरी या गावाला वॉटरकप स्पर्धेत मदत करून जयलोद्धा म्हणून परिचित असलेल्या अभिजित बंडू वंजारी (२०) रा. मांडवा याचा तूर कटर मशीनमध्ये आल्याने मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून वंजारी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

अभिजित वंजारी तरुण शेतकरी शेतात तुरीचे पीक उंच झाल्याने त्याने स्वत: तयार केलेल्या मश्नीनद्वारे तूर पिकाची छाटणी करीत होता. दरम्यान मशीनचा नटबोल्ट तुटून मशीनची धारदार ब्लेड पोटात खुपसल्याने युवा शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्याने सदर तूर छाटणीची मशीन घरीच तयार केली होती.

त्याने आर्वी तालुक्यातील टेंभरी गावाला वॉटरकप स्पर्धा २०१८ मध्ये मदत केली होती. कामाचे नियोजन करताना जागा शोधणे, डिझेल मशीनपर्यंत पोहचविण्यासाठी मदत करण्याचे काम केले होते. तब्बल दीड महिना रात्रंदिवस त्याने स्वयंसेवक म्हणून अविरतपणे काम करुन जलयोद्धा म्हणून तो सर्वत्र परिचित होता. त्याच्या अचानक मृत्यूने वंजारी कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पाडण्यात आले. त्याच्या मागे बराच मोठा आप्त परिवार असून त्याच्या अचानक जाण्याने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here