

वर्धा : घरकुल योजनेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या झारगाव येथील ग्रामसेवक व सदस्याला रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने सोमवारी 21 मार्च रोजी दुपारी 4.30 वाजता झाडगाव येथे केली. प्राप्त माहितीनुसार, तक्रारकर्त्यांनी 15 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वर्धा कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तिने रमाई आवास योजनेच्या लाभासाठी अर्ज केला होता. मात्र तिचा प्रस्ताव वर्धा पंचायत समितीकडे पाठवण्यासाठी ग्रामपंचायत पंचायत सदस्य नरेंद्र वामन संदूरकर (28) व ग्रामसेवक सचिन भास्कर वैद्य (41) यांनी 15 हजार रुपयांची लाच मागितली होती.
घरकुलासाठी तब्बल एक वर्ष ग्रामपंचायतीमध्ये फेर्या मारव्या लागल्या होत्या. तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने कारवाई सुरु केली होती. त्यात लाच मागण्याची माहिती प्राप्त झाली होती. 21 मार्च रोजी दुपारी तक्रारकत्या पैसे घेऊन ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र संदुर्कर यांच्या घरी गेला. तेव्हा नरेंद्र संदुरकर 15 हजार रुपये स्वीकारले होते. त्यावेळी हे पैसे ग्रामसेवक सचिन वैद्य याला दिले होते. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने कारवाई करून रंगेहाथ पकडले. कारवाईतील पैसे जप्त केले असून दोन्ही आरोपींला वर्धा कार्यालयात आणण्यात आले.