आरोपी च्या घरावर दगड फेक! इतवारा हत्याप्रकरण; पोलिसात तक्रार

वर्धा : केवळ ५०० रुपयाच्या वादातून रूपेश खिल्लारे याची नीलेश वालपांढरे याने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना इतवारा परिसरात घडली होती. याचा वचपा काढण्यासाठी मृताच्या भाच्यांनी आरोपी नीलेश वालमांढरे याच्या घरावर दगडफेक करून त्याच्या सासऱ्याला विळ्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

प्रकाश लोखंडे याच्या मुलीने आरोपी नीलेश वालमांढरेसोबत विवाह केला असून, दोघांचीही घरे लागूनच आहेत. नीलेशने रूपेशची हत्या केल्याने संतापलेल्या त्याच्या भाच्यांनी प्रकाशच्या मालकीच्या ऑटोवर दगडफेक करून घरावरही दगडफेक केली. सोनू वासनिक व विनय वासनिक यांनी विळ्याने प्रकाशला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here