लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळवून नेले आणि केले लैंगिक शोषण! पोलिसांत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : लग्नाचे आमिष देत १६ वर्षीय मुलीला पळवून नेत स्वत:च्या घरी नेऊन तिचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावात ३ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने गावात एकच खळबळ माजली.१६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे आई वडिल शेतात काम करण्यासाठी गेली होती. सायंकाळच्या सुमारास तिची आई शेतातील काम आटोपून घरी आली असता तिला पीडिता घरात दिसून आली नाही. तिच्या आईने गावात तिचा शोध घेतला पण, ती कुठेही मिळून आली नसल्याने पीडिता ही दुपारच्या सुमारास एका मुलाच्या दुचाकीवर बसून गेल्याचे तिला समजले.

मुलीला विशाल नामक मुलानेच पळवून नेल्याचा संशय आल्याने पीडितेची आई व वडिलांनी विशाल राहत असलेल्याल तळेगाव येथील त्याच्या घरी जात पाहणी केली असता पीडिता विशालच्या घरी मिळून आली. आईने पीडितेला विचारणा केली असता पीडितेने विशालसोबत वर्षभरापूर्वी ओळख झाली असून सहा महिन्यापूर्वी त्याने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केले होते. आजही त्याने लैंगिक शोषण केल्याचे पीडितेने सांगितल्याने पीडितेच्या आईने थेट अल्लीपूर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विशाल विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here