मित्रानेच केला मित्राच्या पत्नीवर अत्याचार! पतीलाही केली मारहाण; शहरातील घटनेने खळबळ

वर्धा : पतीच्या मित्राने घरी कुणी नसल्याचे पाहून विवाहितेवर बळजबरी अत्याचार केला. तसेच याची वाच्यता केल्यास मुलाबांळांना जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्या पतीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शहरातील प्रतापनगर परिसरात ही घटना उघडकीस आली. पीडिता आणि आरोपी शेखर सुधाकर मेहरे रा. डेहनकर लेआऊट हे काही वर्षांपूर्वी नालवाडी परिसरात किरायाने राहत होते. दरम्यान विवाहितेच्या पतीसोबत आरोपी सुधाकरची ओळख झाली. दोघेही चांगले मित्र बनले. वर्षभरानंतर पीडितेने नालवाडी येथील घर सोडून डेहनकर लेआऊट परिसरात राहायला गेले. आरोपी शेखर हा अधूनमधुन महिन्यानंतर शेखरने पीडितेच्या पतीला भेटण्यास जायचा.

दोन वर्षांपूर्वी पीडितेच्या पतीने आणि आरोपी शेखरने किरायाने घर घेतले. आरोपी शेखर मेहरे हा देखील कुटुंबासह तेथेच राहत होता. शेखरचा त्याच्या पत्नीसोबत वाद झाल्याने त्याची पत्नी माहेरी गेली होती. दोन महिन्यानंतर शेखरने तेथील खोली रिकामी करून तेथून दुसरीकडे राहायला गेला. पीडिता घरी एकटी असताना आरोपी शेखर हा तिच्या घरी आला आणि आतून दाराची कडी बंद करीत पीडितेसोबत बळजबरी करून अत्याचार केला. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here