

पुलगाव : दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरास पुलगाव पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक करून गुन्हा उघडकीस आणला. शेख इमरोज अब्दुल जलील (२७), रा. हिमायतनगर, जि, नांदेड, ह.मु. लिंगूफल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
नितीन चिरडे, रा. पुलगाव याची एम.एच.3२ एल. २६०२ क्रमांकांची दुचाकी चोरट्याने चोरून नेली होती. याचा तपास पोलीस करीत असताना त्यांना शेख अब्दुल जलील हा एका ढाब्यासमोर दुचाकीवर बसून असलेला दिसला. पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. तसेच त्याचा मित्र मतीन व त्याचा लहान भाऊ नदीम यांनी एम.एच.२० डी.आर ६४९३, एम.एच. ०२ बी.डब्ल्यू ७१५०, एम.एच. २६ टी.सी. ४०५० अशा तीन दुचाकी विकण्यासाठी आणून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या सर्व दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई पोलीस निरीक्षक शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनात राजेंद्र हाडके, संजय पटले, पंकज टाकोणे, महादेव सानप, शरद सानप यांनी केली. पुढील तपास पोलीस करीत आहे.