दुचाकीची धडक! व्यक्ती गंभीर जखमी; पोलिसात तक्रार दाखल

वर्धा : दुचाकी चालकाने भरधाव दुचाकी चालवून मागाहून दुचाकीला धडक दिली. यात एक व्यक्‍ती जखमी झाला. सावंगीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला. भगवान वर्मा हे एम.एच. ३२ आर. ५३५० क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना मागाहून भरधाव येणाऱ्या अज्ञात दुचाकीचालकाने धडक दिली. यात भगवान वर्मा हा गंभीर जखमी झाला, याप्रकरणी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here