ये मेरा एरिया है…यहां दारू बेचनेका नही!

वर्धा : या परिसरात मीच दारू विकतो…तू दारूची कशी काय विक्री करतो, असे म्हणून दोन दारूविक्रेत्यांमध्ये चांगलाच राडा झाला. दारूविक्रेत्यांचा हा प्रताप कलोडे चौकातील नागरिकांनी डोळ्या देखत पाहिला. याप्रकरणी एकमेकांविरूद्ध हिंगणघाट पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अभिलाश उर्फ बिटु श्रावणे याने दिलेल्या तक्रारीनुसार तो चौकात उभा असताना अक्षय सोनकुसरे हा आला आणि त्याने तु येथे दारूचा धंदा करायचा नाही असे म्हणून शिवीगाळ करणे सुरू केले.

शिवीगाळ करण्यास हटकले असता अक्षय सोनकुसरे याने अभिलाष श्रावणे याच्यावर शस्त्राने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर अक्षय सोनकुसरे याच्या तक्रारीनुसार तो पानटपरीवर उभा असताना बिठ्ट्या नाकम युवक आणि त्याचा मित्र आला आणि येथे दारूचा व्यवसाय करायचा नाही, हा माझा एरिया आहे येथे मीच दारु विकेल असे म्हणून धारदार शास्त्राने मारहाण केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here