शेतकर्यांनी पुकारलेल्या भारत बंदला बहुजन समाज पार्टीचे समर्थन! कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन

वर्धा : शेती संबंधात केंद्र शासनाने तीन नवीन कायदे केले आहे. हे तीनही शेतकरी विरोधी कायदे परत घ्यावे, रद्द करावे यासाठी दिल्लीला मोठया प्रमाणात शेतकरी आंदोलन करित आहे. त्या आंदोलनास बहुजन समाज पार्टीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बहन कु. मायावतीजी यांनी समर्थन जाहीर केले आहे.

तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनास समर्थन म्हणून मंगळवार ता. ८ रोजी होणार्या सर्व विरोधी पक्ष व सामाजिक संघटना द्वारे भारत बंदचे आव्हान करण्यात आले आहे या भारत बंद मध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने समर्थन जाहीर करण्यात आले आहे.

बहुजन समाज पार्टीच्या वर्धा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकरते यांनी वर्धा जिल्ह्यातील आंदोलन यशस्वी करण्याकरिता सकाळी बसपा कार्यालय वर्धा येथे एकत्रीत व्हावे त्यानंतर शिवाजी चौकातून सकाळी १० वाजता निघाणाऱ्या मोर्च्यात आपण सर्व सहभागी व्हावे व हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन मोहन राईकवार, जिल्हा अध्यक्ष बसपा वर्धा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here