
वर्धा : बहुजन समाज पार्टी जिल्हा वर्धाच्या वतीने बसपा कार्यालय वर्धा येथे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य प्रतिमेला माल्यार्पण करून वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.
बीएसपी कार्यालय पासुन तर डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत जिल्हा अध्यक्ष मोहन राईकवार यांच्या नेतृत्वात पैदल मार्च काढण्यात आला तिथे पुतळ्याला माल्यार्पण करून व पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी दीपक भगत, अनोमदर्शी भैसारे, अँड. अभिषेक रामटेके, दिनेश वाणी, विजय ढोबळे ओमप्रकाश भालेराव, विवेक सिन्हा, प्रकाश ताजने, पुरुषोत्तम लोहकरे, हरिदास मेंढे, किशोर मेंढे, नागोराव शंभरकर, ज्ञानेश्वर मून, रोहित तोतडे, अजय जामगडे, सुधाकर भगत, संजय मून, सुभाष सुटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.





















































