

वर्धा : गेल्या वर्षीपासून देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेचा शिरकाव झाला, पण फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विविध वनस्पतींचा वापर करीत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. यामध्ये विशेष करून तुळस, अश्वगंधा, अद्रक, गिलोय (अमृता), पुदिना या वनस्पतीचा वापर करीत असल्याचे दिसून येते. तसेच कडुनिंबाचा ही मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. कडुनिंबाच्या सालीचा काढा, पाल्यांचा रस, नागरिक आवर्जून घेत आहेत, या रोपांचे गुणधर्म.
तुळस
उचकी लागणे, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यांमध्ये दुखणे वगैरे विकारांमध्ये तुळस उपयुक्त असते. कफ, तसेच वातदोषाचे शमन करणारी पित्त वाढविणारी तुळस दुर्गंधीचा नाश करण्यास सक्षम असते. तुळशीमध्ये पर्यावरणाची शुद्धी करण्याचाही गुणधर्म असतो.
अश्वगंधा
अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिटँड आणि अँटिइंफ्लेमेंटरीचे गुण आढळतात. यामुळे हृदयासंबंधीत समस्येपासून वाचता येते. अश्वगंधा चूर्ण खाल्ल्याने हृदयाच्या मांसपेशी अधिक मजबूत होतात आणि कोलेस्ट्रॉलचा खराब स्तर कमी करण्यासाठी याची मदत होते.
अद्रक
अद्रकमध्ये अँटिफंगल, अँटिसेफ्टिक, अँटिबायोटिक, अँटिव्हायरल असे विशेष गुण आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारचे व्हिटॅमिन आणि खनिजेही आहेत, जे आपल्या स्वास्थ्यासाठी खूप लाभदायक आहे. म्हणून आल्याचा उपयोग औषधी सामग्रीमध्येही केला जातो,
अमृता
गिलोय गुडुची आणि अमृता म्हणूनही ओळखले जातात, हे अँटिऑक्सिडेंटमध्ये समृद्ध आहे, जे मुक्त रॅडिकल्सशी लढायला मदत करते आणि पेशींना निरोगी आणि रोगांपासून दूर ठेवते. सध्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिला जात आहे आणि हे करण्यासाठी गिलोय हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
पुदिना
आयुर्वेदानुसार पुदिना हा दीपक, पाचक, रुचकर स्वादप्रिय, हृदय, उष्ण वात आणि कफ दोषहारक व कृमीनाशक आहे, तसेच पुदिन्यामध्ये कॅल्शियम लोह, फॉस्फरस क, ड व ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते, तर ब जीवनसत्त्व अत्यल्प प्रमाणात असते.