पैसे दुप्पट करण्याच्या नादात वृद्धाला ३० लाखांनी गंडविले! आठ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

वर्धा : पॉलिसी काढल्यानंतर पाच तर्षे ३० लाख रुपये जमा केल्यावर त्याचे ४५ लाख रुपये मिळतील, असे आमिष देत आठ जणांनी वयोवृद्धाची तब्बल ३० लाख रुपयांनी फसवणूक केली. घटना हिंगणी गावात उघडकीस आली. याप्रकरणी १३ रोजी सेलू पोलिसात दिली. सुधाकर दादाजी भट (६८) यांच्याकडे १३ जानेवारी २०१७ मध्ये आरोपी रंजना अवस्थी, विक्रम बत्रा, अनुराग ठाकूर, श्वेता सिंग, आकाश वर्मा, रमेश जैत, राजवीर गौतम, दीपक सिंग हे गेले आणि मी एफआयसीमधून आलेलो आहे.

एक पॉलिसी काढल्यानंतर पाच वर्षापर्यंत ३० लाख रुपये जमा करावे लागेल त्यानंतर ३० लाखांचे ४५ हजार रुपये तुम्हाला मिळेल, असे आमिष दाखविले होते. सुधाकर भट यांनी विश्‍वास ठेवला. आरोपींनी वारंवार पैसे मागितले. सुधाकर यांनी ३० लाख रुपये जमा केले. पाच वर्षे झाल्यावर पैसे परत करण्याबाबत वारंवार पैशाची मागणी केली असता आरोपींनी खात्यात पैसे पाठवितो, असे आश्वासन देत पैसे पाठविले नाही, सुधाकर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सेलू पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी आठही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here