वडनेर येथे जेष्ठ नागरिक दिनाचे आयोजन! आधारशीला जेष्ठ महिला मंडळाद्वारे सत्कार

हिंगणघाट : तालुक्यातील वडनेर येथील आधारशिला जेष्ठ महिला मंडळ, यांच्या वतीने जेष्ठ नागरिक दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जेष्ठ महिला सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

वडनेर येथील संकटमोचन मंगल कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असून
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विमला खत्री, अध्यक्षा आधारशिला जेष्ठ महिला मंडळ या होत्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी वडनेर ग्रामपंचायतच्या
सरपंचा कविता वानखेडे, पंचायत समिति सभापती शारदा आंबटकर, जिल्हा परिषद सदस्या सौ.जोत्सना सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर मार्गदर्शिका म्हणून प्रा. लीला नरड आधारशिला जेष्ठ महिला मंडळ, वडनेर तसेच अध्यक्षा स्पंदन जेष्ठ महिला मंडळ, हिंगणघाट हजर होत्या.

कार्यक्रमप्रसंगी जेष्ठ महिला श्रीमती पार्वताबाई आंबटकर श्रीमती सुमतीताई शिंगोटे, मीराबाई दिवे, श्रीमती शोभाताई काळे, कमलाबाई दिवे यांच्यासह मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता संकटमोचन मंगल कार्यालयाचे अध्यक्ष श्याम खत्री तसेच
आधारशिला जेष्ठ महिला मंडळ
सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here