
खापा : भरधाव ट्रॅक्टरने रस्त्याने जाणाऱ्या मुलास जोरात धडक दिली. त्यात .गंभीर जखमी झाल्याने मुलाचा मृत्यू झाला. ही घटना खापा पोलीस ठाण्यांतर्गत सावनेर मार्गावर नुकतीच घडली. अभिषेक जामिक बेठे (१५, रा.खापा, ता. सावनेर) असे मृत मुलाचे नाव आहे. खापा ते सावनेर मार्गावरील राधाकृष्ण सभागृह परिसरात एमएच- ४०/एल-3०४९ क्रमांकाच्या भरधाव ट्रॅक्टरने अभिषेकला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नानकराम दौलत बेठे (५१, रा. बिदोनी, ता. सौंसर, जि.छिंदवाडा) यांच्या तक्रारीवरून खापा पोलिसांनी भादंवि कलप २७९, 3०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला असून, आरोपी ट्रॅक्टरचालकाचा शोध सुरू केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झांबरे करीत आहेत.