स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव निमित्य भिंती चित्र स्पर्धा! जिल्ह्यातील शाळा होणार सहभागी


वर्धा : महात्मा गांधी यांच्या पावनभूमीत स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव व संविधान दिनाचे औचित्य साधून भिंती चित्र स्पर्धेचे आयोजन वर्धा जिल्हाधिकारी व शिक्षण विभाग व सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने ता. 25 व 26 रोजी आयोजन सिव्हिल लाईन परिसर येथे करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण जिल्ह्यातील शाळा सहभागी होणार आहे. यामध्ये वर्ग 8 ते 12 पर्यंतचे विध्यार्थी व शिक्षक सहभागी होणार आहे.

चित्रकारिता सर्व साहित्य जिल्हाधिकारी व सेंट्रल जि एस टी ऑडिट नागपूर यांच्या सहयोगाने प्राप्त झाले आहे. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुबंई येथील विधार्थी स्पर्धेतील विध्यार्थांना मार्गदर्शन व सहकार्य करतील या आयोजनात वर्धा कलाध्यापक संघ सहभागी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here