

खरांगणा : खरांगणा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कृष्णापुर शिवारात पोलिसांनी वॉशआउट मोहिमे अंतर्गत गुप्त माहितीच्या आधारे दारु अड्ड्यावर छापा टाकुन राबविलेल्या कारवाईत दहा हजाराचा दारु सडवा व साहित्य जागेवरच नष्ट केला असून दारु विक्रेता हा घटनास्थळावरून पसार होण्यास यशस्वी झाला.
खरांगणा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक गावात दारुड्यांनी हैदोस घातला असून गावठी दारु मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध असते याबाबत पोलिसांनी विशेष काळजी घेऊन त्यांचा बंदोबस्त करणे जरुरीचे झाले आहे.
खरांगणा पोलिसांनी ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे केली असून खरांगणा ठाण्याचे ठाणेदार संजय गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल देवराव येंकर, गजानन बावणे, गृहरक्षक दलाचे दोन सैनिक यांनी कृष्णापुर शिवारात घटनास्थळी जाऊन हा दारू अड्डा नष्ट केला. आरोपी ज्ञानेश्वर मुंडे कार राहणार रामपूर हा घटनास्थळावरून पसार झाला आहे.