प्रेमचंद जयंती निमित्‍य उद्या ऑनलाइन राष्‍ट्रीय परिसंवादाचे आयोजन

वर्धा : महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय याच्‍या क्षेत्रीय केंद्र प्रयागराज यांच्‍या वतीने 31 जुलै रोजी प्रेमचंद जयंती निमित्‍त ‘प्रेमचंद आणि स्‍वतंत्रता आंदोलन’ या विषयावर दुपारी 4.00 वाजता कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ऑनलाइन राष्‍ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले आहे.

परिसंवादात प्रकुलगुरू प्रो. हनुमानप्रसाद शुक्‍ल, प्रो. कृष्‍ण कुमार सिंह, प्रो. अवधेश कुमार शुक्‍ल, इलाहाबाद विश्‍वविद्यालय, प्रयागराजचे प्रो. योगेंद्र प्रताप सिंह, दिल्‍ली विश्‍वविद्यालयाच्‍या प्रो. कुमुद शर्मा आणि भारतीय उच्‍च अध्‍ययन संस्‍थान, शिमलाचे उपाध्‍यक्ष, प्रो. चमनलाल गुप्‍त व्‍याख्‍यान देतील. स्‍वागत भाषण एसोशिएट प्रोफेसर डॉ. अवंतिका शुक्‍ला देतील तर एसोशिएट प्रोफेसर डॉ. आशा मिश्रा आभार व्‍यक्‍त करतील. डॉ. जगदीश नारायण तिवारी मंगलाचरण प्रस्‍तुत करतील. कार्यक्रमाचे निर्देशन क्षेत्रीय केंद्र प्रयागराजचे अकादमिक निदेशक प्रो. अखिलेश कुमार दुबे करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here